Land Record Yojana Maharashtra: खुशखबर..!! आता गुंठा-गुंठा तुकडे करून जमिनीची विक्री करता येणार, लगेच पहा जमीन खरेदी विक्रीचे नवीन नियम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Record Yojana Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने जमीन विक्री किंवा खरेदी करण्याबाबत नवनवीन नियम आणले आहेत. या नवीन नियमांमुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होणे बंद झाले आहे. पूर्वीच्या काळी अनेक गरीब शेतकऱ्यांची जमीन सावकार खरेदी करायचे परंतु, त्यांना योग्य रक्कम दिली जात नव्हती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान व्हायचे.

परंतु आता सरकारने जमिनीच्या शासकीय किमती देखील जाहीर केले आहेत. आणि त्यानुसारच शेतकरी जमिनीची खरेदी विक्री करू शकतात. त्याचबरोबर नियमात बदल झाल्यामुळे गरीब शेतकऱ्यांची फसवणूक देखील थांबले आहे. महाराष्ट्रातील फसवणुकी संदर्भात जास्त घटना घडत होत्या. यामुळे राज्य सरकारने यामध्ये विशेष लक्ष दिले. आणि जमीन खरेदी विक्रीच्या नियमात बदल केले.

या बदलांमुळे गुंठा गुंठा जमीन खरेदी विक्री याबाबत देखील नियम बदलला होता. यामुळे अनेक दिवस शेतकऱ्यांना जमिनीचे तुकडे पाडून जमीन विकता येत नव्हती. परंतु पुन्हा सरकारकडून या नियमात बदल करून आता एक गुंठा, दोन गुंठा किंवा तीन गुंठा अशा पद्धतीने जागा विकता येईल किंवा खरेदी करता येईल.

तुकडेबंदी कायद्यात काय बदल झाला?

तुकडेबंदी कायदा हा अनेकदा बदलला गेला. त्याच बरोबर 14 जुलै 2023 रोजी राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या जीआर नुसार, जमिनीचे तुकडे करून खरेदी-विक्री करण्यावर शेतकऱ्यांना बंदी घालण्यात आले होते. परंतु अनेक शेतकऱ्यांना विहीर खोदकाम करण्यासाठी, किंवा रस्ता बनवण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी तुकड्यांमध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करावी लागते. अशी अडचण आल्यावर शेतकऱ्यांनी काय करावे? असा महत्त्वपूर्ण प्रश्न सरकार पुढे देखील आला. यामुळे खालील तुकडे बंदी कायद्यात चार सुधारणा करण्यात आले आहेत.Land Record Yojana Maharashtra

1 तुकड्यांमध्ये जमीन विहिरीसाठी शेतकऱ्याला विक्री करता येईल.

2 शेत रस्ता बनवण्यासाठी शेतकऱ्याला तुकड्यांमध्ये जमीन खरेदी विक्री करता येईल.

3 सार्वजनिक प्रयोगाजनासाठी भूसंपादन केल्यानंतर त्याचबरोबर थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणबद्ध क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक थोड्या जमिनीसाठी शेतकरी आपली गुंठ्यामध्ये जमीन खरेदी विक्री करू शकतो.

4 तसेच केंद्र आणि राज्य सरकार मार्फत राबवल्या जाणाऱ्या ग्रामीण घरकुल योजनेच्या पूर्वजनासाठी देखील शेतकरी गुंठा गुंठ्यामध्ये जमीन खरेदी विक्री करू शकतात.

म्हणजेच मित्रांनो वरील चार कारणांसाठी शेतकरी गुंठ्यामध्ये जमीन खरेदी विक्री करू शकतात. तसेच या पद्धतीने जमीन खरेदी विक्री करताना शेतकऱ्यांना जिल्हा अधिकाऱ्याकडे नमुना 12 प्रमाणे अर्ज देखील भरावा लागेल. याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती जिल्हा कार्यालयांमध्ये घेऊ शकता.Land Record Yojana Maharashtra

Leave a Comment