E-Pik Pahani ई पीक पाहणी ची जबाबदारी आता पोलीस पाटलाकडे सोपवण्यात आले आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E-Pik Pahani नमस्कार मित्रांनो आपण जर शेतकरी असाल तर आपल्याला माहीतच आहे की ई पीक पाहणी करणे खूप महत्त्वाचे आहे आता ही जबाबदारी पोलीस पाटलाकडे देण्यात आलेले आहे त्याबरोबर याआधी ही जबाबदारी कोणाकडे होती याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

ई पीक पाहणी ची जबाबदारी पोलीस पाटलाकडे देण्यात आलेली आहे पण ही जबाबदारी कोतवालांवर असते पण ते आता संपावर असल्यामुळे हे जबाबदारी पोलीस पाटलांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे.

E-Pik Pahani राज्य सरकारकडून  ई पीक पाहणी नोंद ऑनलाईन चा निर्णय घेण्यात आलेला होता वास्तविक पाहता शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जाऊन ही माहिती ऑनलाईन भरणे अपेक्षित होते आणि त्याबरोबरच शेतकऱ्याला तलाठी कोतवाल यांची मदत घ्यावी लागत होती आता कोतवाल संपावर असल्यामुळे पोलीस पाटलांनाच शेतकऱ्यांची मदत करावी लागत आहे.

आता पाहिले तर खरीप हंगाम संपला आहे तरीसुद्धा  ई पीक पाहणी शासन पातळीवर उपलब्ध झालेली नाही यामुळे हे काम करून घेण्याची जबाबदारी पोलीस पाटलाकडे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर धान्य दुकानदार, ग्रामपंचायत ऑपरेटर यांच्याकडे सुद्धा ह्या कामाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

जर आपल्याला सुद्धा  ई पीक पाहणी करायचे असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकता जर अडचण येत असेल तर आपल्या जवळील धान्य दुकानदार, ग्रामपंचायत ऑपरेटर, आणि पोलीस पाटलांची मदत घेऊन सुद्धा आपण  ई पीक पाहणी करू शकता.

जर आपल्याला  ई पीक पाहणी करता येत नसेल तर आपल्या जवळील शेजारची  ई पीक पाहणी झालेली असेल त्यांच्याकडून माहिती घेऊन आपण ऑनलाइन पद्धतीने सुद्धा करू शकता ऑनलाइन पद्धतीने  ई पीक पाहणी करताना आपण काळजी घेतली पाहिजे माहिती संपूर्ण बरोबर भरावी.E-Pik Pahani

Leave a Comment