Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे या महिलांना परत करावे लागणार..!! शिंदे सरकारच्या नवीन अटी जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki Bahin Yojana: आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना शिंदे सरकारने आताच सुरू केलेली महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यात दोन हप्ते एकत्र जमा करण्यात आले आहेत. परंतु या योजनेमध्ये अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता ज्या महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेऊन लाभ घेतला आहे त्यांना पैसे परत करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात येणार आहेत. यामुळे चुकून तुमचे नाव या यादीत किंवा यामध्ये आहे की नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका पात्र महिलेला एका आर्थिक वर्षात तब्बल 18 हजार रुपये दिले जाणार आहेत. यामुळे ही रक्कम महिलांसाठी खूपच फायद्याचे ठरणार आहे. या योजनेचा लाभ हा 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना दिला जाणार आहे. यामध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहे.

विधवा, अविवाहित, घटस्फोटीत, निराधार तसेच इत्यादी महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. तसेच ज्या महिला अविवाहित आहेत त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे.

परंतु ज्या महिलांचा जन्म पर राज्यात झाला असेल आणि अशा महिलांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल अशा महिलांना देखील या योजनेसाठी पात्र ठरवण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. तसेच या योजनेसाठी एक जुलै 2024 पासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली असून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत.Ladaki Bahin Yojana

त्याचबरोबर आत्ताच सरकारकडून एक नवीन अपडेट समोर आले आहे. या नवीन अपडेट नुसार ज्या महिला अपात्र आहेत त्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. आता अशाच महिलांकडून या योजनेच्या पैशांची वसुली सरकारकडून करण्यात येणार आहे. यामध्ये ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे. अशा महिलांनी देखील अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला आहे आता अशा महिलांकडून देखील या योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहेत.

म्हणजेच ज्या महिलांना एखाद्या दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या महिलेला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही. म्हणजेच एका महिलेला दुहेरी लाभ मिळणार नाही. म्हणजेच एका महिलेला एकाच योजनेतून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.Ladaki Bahin Yojana

Leave a Comment