Pm Kisan Yojana: पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला 3000 हजार रुपये मिळणार, लगेच पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने पी एम किसान योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना म्हणून सुरू केलेली एक योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये देण्यात येतात. असे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्यांच्या अंतराने 2000 हजार रुपये असा समान हप्ता देण्यात येतो. तसेच मित्रांनो आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत. म्हणजेच एकूणच शेतकऱ्यांच्या खात्यात 34 हजार रुपये आतापर्यंत केंद्र सरकारकडून जमा करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर आता सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी मिळालेली आहे. कारण आता केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेप्रमाणेच प्रधानमंत्री मानधन योजनाही सुरू करण्यात आलेले आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून देशभरातील पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या वयाच्या साठ वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार आहे. चला तर मग या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र राहणार आहेत? या योजनेच्या अटी काय आहेत? अशी संपूर्ण माहिती पाहूयात.Pm Kisan Yojana

पी एम किसान मानधन योजना संपूर्ण माहिती

पी एम किसान मानधन योजनेचा लाभ हा साठ वर्षानंतर शेतकऱ्यांना दिला जातो. तसेच या योजनेअंतर्गत साठ वर्षानंतर मासिक तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. यासाठी शेतकऱ्यांना 55 रुपये ते दोनशे रुपये या योजनेत जमा करावे लागतात. आणि त्यानंतर साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेतून शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळते.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र किंवा राज्य नोडल अधिकारी यांच्याकडून मोफत नोंदणी करता येणार आहे. या योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्यांनी 18 ते 40 वयोगटात असताना नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याच्या वयानुसार त्याला 55 रुपये ते दोनशे रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. सेच या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असावी.

त्याचबरोबर मित्रांनो, अधिकृत माहितीनुसार या योजनेमध्ये आतापर्यंत तब्बल वीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. यामुळे ही योजना देखील शेतकऱ्यांसाठी खूपच मोठी आर्थिक दृष्ट्या फायद्याची योजना ठरणार आहे.Pm Kisan Yojana

Leave a Comment