Rain Alert Today: सावधान..!! राज्यात पुन्हा अतिवृष्टी होणार, या जिल्ह्यांना हाय अलर्ट जाहीर; लगेच पहा संपूर्ण हवामान अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, दिल्ली एनसीआरसोबतच देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात सूर्यदर्शन मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांना असे वाटले आहे की आता पाऊस उघडला आहे. परंतु असे नाही. पुन्हा राज्यभरात जोरदार पाऊस होण्याचा अनुमान हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गणपतीच्या पिरेडमध्ये दरवर्षीच पाऊस सुरू असतो. परंतु यावर्षी पावसाळा हा वेगळाच दिसून आला आहे. तसेच या गणपतीच्या पिरेड मध्ये देखील पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा तसेच महाराष्ट्र या जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. आणि यामुळे या राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यात पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे.

तसेच आताच ताज्या हवामान अंदाजानुसार पुढील दोन दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 14 आणि 15 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभरातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी तसेच आपल्या जनावरांची काळजी घ्यावी.Rain Alert Today

Leave a Comment